महाराष्ट्र

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची सुवर्ण संधी*

सांगोला नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध रेशन धान्य दुकानाच्या ठिकाणी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड वितरित करणे संबंधी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.*

केंद्रशासन पुरस्कृत आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ‘प्रती कुटुंब वार्षिक 5 लाखापर्यंतचा’ वैद्यकीय विमा उपलब्ध करून दिला जातो. याकरिता त्या कुटुंबाकडे गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे . आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याकरिता दिनांक 10 मार्चपासून सांगोला नगरपरिषदेने शहरातील खालील 10 ठिकाणी शिबिराचे आयोजन केलेले आहे.

 

1. प्रियदर्शनी महिला औ.उ.स. मर्या. दक्षता हॉस्पिटल जवळ सांगोला,2. अंबिका महिला बचत गट

3. खरेदी विक्री संघ १, 4. खरेदी विक्री संघ २, क्षेत्रीय माळी सोसायटी बुरांडे पिठाच्या गिरणी जवळ कचेरी रोड सांगोला , ग्रामोद्योग तेल उत्पादक संस्था, जय भवानी चौक ,सांगोला, श्री.बलभीम धनंजय चांडोले,चांडोले वस्ती, विणकर को.ओ.सो. कोष्टी गल्ली ,सांगोला, श्री संतोष रमेश बनसोडे भीम नगर,शिवपार्वती म.औ. सह संस्था,दक्षता हॉस्पिटल जवळ सांगोला. या ठिकाणी सांगोला नगर परिषदेचे 10 ऑपरेटर उपलब्ध करून दिलेले आहेत.

 

 

तसेच उद्या दिनांक 13 मार्च 2025 रोजी सकाळी 8 ते सायं. 5 पर्यंत जिल्हा परिषद शाळा चांडोलेवाडी येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढणे करिता सांगोला नगरपरिषदेच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरी सांगोला शहरातील पात्र लाभार्थी यांनी या विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

 

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी 1. स्वतःचे आधार कार्ड , आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, रेशन कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button