सोलापूर जिल्हा नेटबॉल संघामध्ये नाझरा विद्यामंदिरच्या 10 खेळाडूंची निवड

नाझरा(वार्ताहार):- अठराव्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर व सब ज्युनिअर नेटवॉल स्पर्धा 10 ते 12 जानेवारी दरम्यान मोहाड जि. वर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धेकरिता सोलापूर जिल्हा संघाची निवड सहा जानेवारी रोजी सोलापुर येथे करण्यात आली होती.
यामध्ये नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या दहा विद्यार्थ्यांची निवड जिल्हा संघात झाली आहे. बसवेश्वर चौगुले, विक्रम पांढरे,तेजस पाटील, तुषार बनसोडे,सोमनाथ गोसावी,आदित्य मिसाळ यांची मुलांच्या संघामध्ये तर दीक्षा वाघमोडे, गौरी चौगुले, सुप्रिया बंडगर व साक्षी वाघमोडे यांची मुलींच्या संघामध्ये निवड झाली आहे.
सदर विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक स्वप्निल सासणे यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील स्पर्धेसाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मंगल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. नाझरा विद्यामंदिर परिवाराच्या वतीने निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर कडलास येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नाझरा विद्यामंदिर प्रशालीची विद्यार्थिनी सिया बाबर हिने पाचवा क्रमांक मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले.