वाचन संकल्पसिद्धीसाठी करा कृतनिश्चय-प्रा.प्रबुद्धचंद्र झपके; सांगोला नगर वाचन मंदिरमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम

सांगोला ( प्रतिनिधी ) एखाद्या गोष्टीसाठी संकल्प केला म्हणजे विशिष्ट हेतूने विशिष्ट कालावधीत एखादे काम पार पाडायचे असे ठरवले, निश्चय केला, निर्धार केला. आणि त्याप्रमाणे वागले की तो संकल्प तडीला जाईल याची खात्री असते. पण नुसत्याच संकल्पाने सिद्धी प्राप्त होत नाही.त्याचप्रमाणे वाचन संकल्प करा.व आजपासून वाचन करायचे या मनाशी बांधलेल्या खूणगाठीशी इमान राहायचे असा कृतनिश्चय करा तरच ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचा हेतू साध्य होईल असे प्रतिपादन प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले नगर वाचन सांगोला येथे आयोजित ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमामध्ये अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व उत्कृष्ट वाचक योगगुरू मिलिंद पतकी, साहित्यिक शिवाजी बंडगर, नगर वाचन मंदिर उपाध्यक्ष डॉ.प्रभाकर माळी, सहसचिव शंकरराव सावंत, संचालक दादासाहेब खडतरे,सानेगुरुजी कथामलेचे अध्यक्ष भिमाशंकर पैलवान,सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड उपस्थित होते. प्रथम ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून झाले व वाचन संकल्प कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनानी झाली.
पुढे बोलताना प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी उपक्रमामधील वाचनाचा संकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने रामायणातील एक गोष्ट सांगून आळस केला तर कोणतीच गोष्ट तडीस जात नाही असे सांगत आज पासून वाचन सुरू करा.वाचनातून नक्कीच तुमच्याकडे प्रगल्भता येईल असे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे उत्कृष्टवाचक मिलिंद पतकी यानी वाचनाची सवय कशी लागली हे सांगताना कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांची आठवण सांगत त्यांच्या मार्गदर्शनामुळेच वाचनाची सवय लागली आणि आज नगरवाचनचा उत्कृष्ट वाचक ठरलो याचा आनंद आहे.जीवनामध्ये वाचनाचे महत्त्व सांगत यावळी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला. साहित्यिक शिवाजी बंडगर यांनी आपल्या जीवनामध्ये वाचनाचे महत्त्व खूप आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.त्यातून चांगले विचार आत्मसात होतील व आपली प्रगती होईल असे विविध उदाहरणातून पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी नगर वाचन मंदिर सांगोला संचालक सौ.शुभांगीह घोंगडे,प्रा.शिवशंकर तटाळे, ग्रंथपाल रणजित भंडारे,सहा.ग्रंथपाल शामकांत सावंत,लिपिक रमेश कोकरे, कर्मचारी अनंत ढोले, सांगोला विद्यामंदिरचे सुर्यकांत कांबळे,वाचक, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर नगर वाचन मंदिरचे सचिव मिलिंद फाळके यांनी आभार प्रदर्शन केले.
——————————–
वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमामध्ये नगर वाचन मंदिर सांगोला येथे आयोजित ग्रंथ प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी विविध ग्रंथ,पुस्तके पाहिली. त्याचबरोबर त्याचे सामुदायिक वाचन केले ही विद्यार्थ्यांसाठी वैचारिक मेजवानीच होती.त्याचबरोबर वाचन संकल्प उपक्रमामध्ये त्यांनी केलेला वाचनाचा संकल्प जीवनातील पुढील प्रगतीसाठी दिशादर्शक असा होता.