महाराष्ट्र
रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा संपन्न..

सांगोला: रोटरी क्लब सांगोला आणि इंटरॅक्ट क्लब कै.दत्तात्रय चौगुले विद्यालय यलमार मंगेवडी यांच्यावतीने कै.दत्तात्रय चौगुले विद्यालय येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
या स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे..प्रथम क्रमांक कु.प्रणाली समाधान येलपले.. इयत्ता नववी. द्वितीय क्रमांक कु. नम्रता नितीन भडंगे… इयत्ता नववी तृतीय क्रमांक कु. स्नेहल अशोक कांबळे…इयत्ता सातवी
यांना रोटरी तर्फे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा रोटरीमार्फत घेतल्या जातात. या कार्यक्रमासाठी रोटरी अध्यक्ष रो. इंजि.विकास देशपांडे रो. इंजि. विलास विले,रो.साजिकराव पाटील ,रो. श्रीपती आदलिंगे,रो.अरविंद डोंबे गुरुजी,रो.निळकंठ लिंगे हजर होते.तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरुण कोलवळे व इतर शिक्षक वर्ग हजर होता.