*मा. कुलदीप जंगम (भाप्रसे ) यांनी पंचायत समिती सांगोला येथील खाते प्रमुख ग्रामपंचायत अधिकारी यांचा घेतला आढावा*

पंचायत समिती सांगोला येथे आज दिनांक 7/1/ 25 रोजी सोलापूर जिल्हा परिषद येथील सीईओ, ॲडिशनल सीईओ, डेप्युटी सीईओ व खाते प्रमुख यांची आयोजित केलेल्या पंचायत समिती मधील खाते प्रमुख ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा बैठक घेतली आहे यामध्ये मा. कुलदीप जंगम यांनी सकाळी आठ वाजता वाढेगाव येथे “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहीर लाभार्थीची भेट घेऊन पाहणी केली” तसेच गौडवाडी येथील बायोगॅस व सोलर टॅपची पाहणी केली यावेळी त्यांचे सोबत गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे कृषी अधिकारी दिपाली शेंडे मॅडम उपस्थित होत्या.
पंचायत समितीमध्ये मा. कुलदीप जंगम साहेब यांनी आढावा बैठक घेऊन केंद्र व राज्य पुरस्कृत योजना बाबत मंजूर घरकुले सुरू करणे,घरकुले पूर्ण करणे, बाबत ग्रामपंचायत निहाय आढावा घेतला जर वेळेत घरकुलाचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थी यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांना जबाबदार धरून पुढील कारवाई करणे बाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशादीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ भारत मिशन अमोल जाधव, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे,नरेगा गटविकास अधिकारी अरुण वाघमोडे, लेखा अधिकारी रूपाली रोकडे, जिल्हा कृषी अधिकारी सागर बारवकर उपस्थित होते
यावेळी सर्व कामकाजाचा आढावा घेण्यात आला यामध्ये दलित वस्ती कामकाज, घरकुल स्वच्छ भारत मिशन , 15 वित्त आयोग, सेवानिवृत्त प्रकरणे, पेन्शन प्रकरणे व आयुक्त तपासणी शक ,जलजीवन मिशन याबाबत सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत या कार्यक्रमाचे सुरुवात प्रस्तावना उमेशचंद्र कुलकर्णी गटविकास अधिकारी यांनी केली व सूत्रसंचलन मिलिंद सावंत विस्तार अधिकारी आरोग्य पंचायत समिती सांगोला यांनी केले व शेवटी सर्वाचेच अभार मानून आढावा बैठक सीईओ यांचे परवानगीने संपल्याचे जाहीर केले