डॉ.झाकीर हुसेन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगोला या संस्थेच्या वतीने रमजान ईद निमित्त डॉ. निकीताताई देशमुख यांच्या उपस्थीतीमध्ये सभासदांना साखर व ड्रायफ्रुट चे वाटप

डॉॅ. झाकीर हुसेन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगोला जि. सोलापूर संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्व सभासदांना साखर व ड्रायफ्रुटचे वाटप करण्याचे आयोजन गुरूवार दि. २७/०३/२०२५ रोजी संस्थेच्या कार्यालयामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थीती म्हण्ाून डॉ.निकीताताई देशमुख यांनी आपली हजेरी लावून या पतसंस्थेचे कामकाजाबाबत संपूर्ण माहिती घेवून पतसंस्थेच्या वतीने गरजवंताना याचा लाभ होत असल्यामुळे त्यांच्या अनेक अडचणी दूर होत असल्यामुळे पतसंस्थेच्या या कार्याचे कौतुक करीत या संस्थेची अशीच प्रगती भविष्यामध्ये होत राहो अशा शुभेच्छा दिल्या
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक जावेद इनामदार यांनी आपल्या प्रस्तावनामध्ये संस्था स्थापन होण्यापासुन आज पर्यंत संस्थेची साविस्तर महिती दिली. त्यानंतर जेष्ठ मार्गदर्शक हाजी शब्बीरभाई खतीब यांनी आपले संस्था विषयी अनुभव सांगितले तसेच अॅड. अय्युब पटेल यांनी देखील मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन दिलीपकाका मस्के यांनी पतसंस्थेचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक या विषयी माहिती दिली. त्यानंतर मा. उपनगराध्यक्षा स्वातीताई मगर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
उपस्थित सभासदांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. त्यांनतर व्हाईस चेअरमन कादिर इनामदार यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी समाजसेविका सूचित्रा (काकी) मस्के, संस्थेचे मार्गदर्शक शफी इनामदार, संस्थेचे संचालक सलीम तांबोळी, सैफन बागवान, हाजी गौस नाडेवाले, संचालिका परवीन सव्वालाखे, सल्लागर इन्नुस मुलाणी, अयाज मणेरी, संस्थेचे क्लार्क समिया मणेरी, पिग्मी एजंट शब्बीर मुजावर, अब्दुल पठाण तसेच मोठ्या प्रमाणत संस्थेचे सभासद वर्ग उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरशाद बागवान यांनी केले.