सौ. मंगल प्रभाकर कसबे यांचे निधन

मेडशिंगी- सौ. मंगल प्रभाकर कसबे यांचे वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दिनांक 28-3-2025 रोजी सकाळी 7वाजून 40 मिनिटांनी निधन झाले,मंगल कसबे या समाजभूषण प्रभाकर कसबे गुरुजी यांच्या पत्नी होत्या महिला प्रधान गटाचे अल्प बचत एजन्ट म्हणून काम मेडशिंगी गावात केले,महिलांना बचतीची सवय लावली त्या अत्यंत सहनशील व शांत स्वभावाच्या होत्या.
त्यांनी जवळा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढविली होती. त्यांच्या पश्चात पती, मुलगा प्रशांत, निशांत (चिवळ्या) मुलगी विद्या गडहिरे, दीर अरुण कसबे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मेडशिंगी,वाणी चिंचाळे ग्रामस्थातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पती प्रभाकर कसबे गुरुजी यांचा समाज कार्यात सिंहाचा वाटा आहे. मंगल कसबे यांचा तिसरा दिवस रविवार दिनांक 30- 3- 2024 रोजी सकाळी 8 वाजता मेडशिंगी स्मशानभूमी येथे होईल.



