महाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगोले वस्ती शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोषात संपन्न.

दिनांक 26 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगोले वस्ती (सांगोला) केंद्र कडलास या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन ‘कलाविष्कार 2025’ मोठया उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले  प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन यांनी झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब,  जवळा बीटचे विस्तार अधिकारी श्री अमोल भंडारी साहेब व दैनिक माणदूत एक्सप्रेसचे संपादक मोहन मस्के उपस्थित होते. कलाविष्कार 2025 या कार्यक्रमाची सुरुवात  ‘गणेश वंदन’ या नृत्याने झाली. सदर कार्यक्रमांमध्ये बालगीते, लावणी, पारंपरिक लोकगीते, मूकनाट्य,रिमिक्स गाणी, विनोदी नाटिका व ‘छावा’ हे ऐतिहासिक नाटक यांचा समावेश होता.विशेष म्हणजे ‘उमगाया बाप’ या गाण्यावर शाळेचे मुख्याध्यापक श्री चतुरगुण औताडे यांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्याविष्कार सादर केला.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री अजित पाटील सर व श्री नागेश हवेली सर यांनी केले. सदर कार्यक्रम पाहत असताना कधी डोळ्यात पाणी आले, कधी हसू आले तर कधी छावा मधील डायलॉग ऐकून सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. काही विद्यार्थ्यांनी  व विद्यार्थीनिंनी  नावाजलेल्या अभिनेता व अभिनेत्री प्रमाणे उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वी झाला याची ग्वाही बक्षिसाची लयलूट देत होती.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री औताडे सर, सहशिक्षिका निकम मॅडम व अंगणवाडी सेविका लोखंडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती इंगोले वस्ती, इंगोले वस्ती, खारवटवाडी, केदारवाडी, गेजगेवस्ती व सांगोला शहर  ग्रामस्थ, शाळेचे पालक व शाळेवर प्रेम करणारे शिक्षण प्रेमी या सर्वांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button