सेंट्रिंग कामगाराचा खुन करणार्या आरोपींचा 24 तासात छडा;

सांगोला(प्रतिनिधी):- 45 वर्षीय सेट्रिंग कामगाराच्या खुन प्रकरणी सांगोला पोलीसांकडून 3 आरोपींना अटक केली असून पोलिसांनी शिताफीने या प्रकरणाचा तपास करताना आरोपींच्या 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या.
यावेळी घटनास्थळी उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रम गायकवाड, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व पोलीस स्टाफ यांनी भेट देवुन प्रथम मयताची ओळख पटवुन आजुबाजुचा परिसर सर्च केला परंतु मयताचे कोणासोबत ही काही एक वैर नसल्याचे समजुन आले. घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा पुरावा आरोपीत यांनी ठेवलेला नव्हता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे कठीण झालेले होते. परंतु पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी 4 टिम बनवुन आरोपीत याना निष्पन्न करुन अटक करणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे सदर गुन्हया उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तांत्रीक व गोपनिय माहिती काढुन खुन करणारे 3 आरोपी यांना निष्पन्न केले. यामधील एक आरोपी हा विधी संघर्ष बालक असुन त्यास सोलापूर येथे बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अनंत कुलकणी यांचे नेतृत्वाखाली सांगोला पोलीस ठाणेकडील सहा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर, स.पो.नि नागेश यमगर, सहा पो.नि.प्रशांत हुले, स.पो.नि. खरात, सहा फौज कल्याण ढवणे, पो हे कॉ आप्पा पवार, पो हे कॉ दत्ता वजाळे, पोहेकॉ वाकीटोळ, पोना.बाबासाहेब पाटील, पोना.गणेश मेटकरी, पोना.तुकाराम व्हरे, पोना.नागेश निंबाळकर, पोकॉ.शशिकांत सांवत यांनी मिळून केली.