सांगोला महाविद्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

सांगोला / प्रतिनिधी: सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे १० वे पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष, जनता पक्षाचे संस्थापक सदस्य व ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते म्हणूनही जबाबदारी पार पाडली. पंतप्रधानपदी असताना देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे कार्यही त्यांनी केले. त्यांचे अणुचाचणी पोखरण दोन मधील योगदान, कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी, चीन व पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी केलेला पुढाकार, सुवर्ण चतुर्भुज योजना इत्यादी मधील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे मत यावेळी प्रा. डॉ.अमोल पवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, कार्यक्रमाचे नियोजन डॉ.ए.एम.पवार व श्री. भाऊसो गायकवाड व श्री. अमर केदार यांनी केले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होते.