महाराष्ट्र
कटफळ चेक पोस्ट येथे कडे कोट बंदोबस्तात वाहन तपासणी सुरू
253 सांगोला विधानसभा अंतर्गत महूद दिघंची आटपाडी रोड वर कटफळ येते आंतरजिल्हा चेक पोस्ट उघडण्यात आले असून येथून जाणारे येणारे वाहणाची कसुन तपासणी चोवीस तास चालू असून आदर्श आचारसंहिता प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने VST स्थिर सर्वेक्षण पथक चेक पोस्ट कटफळ येथे स्थापन करण्यात आला असून जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करणे अनधिकृत मद्य, मतदारांना वाटप करण्यासाठी साहित्य, भेटवस्तू , व प्रचार साहित्य याची वाहतूक होते काय हे पाहणे व तपासणी करताना त्याचे व्हिडिओग्राफी करणे वरीलपैकी काही आढळून आल्यास त्यांचा पंचनामा करून संबंधित विभागाच्या ताब्यात देणे यासाठी दिनांक 23 /10/ 24 ते 20 /11/ 24 पर्यंत चेक पोस्ट चालू ठेवण्यासाठीचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी दिले आहेत
आतापर्यंत या पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून 1) महेश आप्पासो जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती सांगोला 2) बसवेश्वर स्वामी सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती सांगोला 3) अभिजीत पवार विस्तार अधिकारी कृषी व
4) राहुल ईश्वर चौगुले या चार पथक प्रमुखाच्या ऊपस्थितीत टीम मार्फत या ठिकाणी 24 तास सकाळी आठ ते सायंकाळी आठ पर्यंत व रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत चेक पोस्टची कसून तपासणी चालू आहे यामध्ये त्यांच्या मदतीला सहाय्यक पथक टीम सदस्य 1) रणजीत कुंभार , 2) विनोद नलावडे कृषी सहाय्यक 3)सुभाष पाटील 4) व्हि.एम .सरतापे कृषी सहाय्यक तसेच 5)पोलीस नाईक सुरेश माळी 6)कॉन्स्टेबल शहाजान शेख तसेच 7)शामराव शिंदे कृषी सहाय्यक 8)संतोष खांडेकर कृषी सहाय्यक 9) तसेच केंद्रीय राखीव दलाचा या सुरक्षा यंत्रणेमध्ये सहभाग आहे सीमा भागात जागो जागी तपासणी चौकी उभारण्यात आले असून रात्रंदिवस पोलीस गस्त चालू असून वाहने तपासली जात आहेत
या साठी वरील टीमचा समावेश असून या टीमने आज पर्यंत या ठिकाणी 5,456 वाहनांची तपासणी करून तसा अहवाल पथकाने आचारसंहिता विभागास सादर केल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे