sangolamaharashtrapolitical

*डॉ.अनिकेत देशमुख युवा मंचच्या वतीने कष्टकरी शेतकरी व जनतेसाठी स्व.भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या स्मरणार्थ सांगोला येथे 19 जानेवारी पासून राज्यस्तरीय गणेशरत्न कृषी महोत्सवाचे आयोजन

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला (प्रतिनिधी):-डॉ.अनिकेत भैया देशमुख युवा मंचच्या वतीने स्व.भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या स्मरणार्थ शुक्रवार दि.19 जानेवारी 2024 ते सोमवार दि.22 जानेवारी 2024 या कालावधीत जिल्हयासह सांगोला तालुक्यातील कष्टकरी शेतकरी व जनतेसाठी गणेशरत्न कृषी महोत्सव 2024 चे आयोजन सांगोला शहरातील डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय मैदान, वासुद रोड, सांगोला येथे करण्यात आले आहे.

 

19 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. गणेश रत्न कृषी महोत्सवचा उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार व शेकापचे चिटणीस भाई.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. विशेष बाब म्हणजे भाई.गणपतराव देशमुख व श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांच्या नावाच्या अनुषंगाने या कृषी महोत्सवास गणेश रत्न हे नाव देण्यात आले आहे. यावेळी राज्यभरातील विविध राजकीय पक्षाचे नेतेमंडळी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

जगाचा पोशिंदा समजला जाणारा बळीराजा आज कमालीच्या संकटात आहे. शेती उद्योगासमोर संकटाची मालिका उभी आहे. निसर्गाचे वेळापत्रक गेल्या दशकात बदलून गेले आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी वेगवेगळ्या उद्भवणार्‍या रोगांमुळे शेती व्यवस्थापनावर गंभीर परिणाम झाला आहे. स्व.आमदार गणपतरावजी देशमुख साहेबांनी प्रयत्न करून 1984 साली या भागांमध्ये शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना राबविली. त्याचा परिणाम असा झाला की, या तालुक्यांमध्ये डाळिंबाच्या माध्यमातून क्रांती घडली पण या डाळिंबावर तेल्या व मर रोगामुळे शेतकर्‍यांच्या बागा उध्वस्त झाल्या. या भागातील शेतकरी हैराण झाला. त्यांच्यासाठी विविध पिकाची तसेच कृषी क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणूनच सांगोला येथे गणेश रत्न कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

 

या प्रदर्शनामध्ये 2 ते 3 लाख शेतकर्‍यांची प्रदर्शनाला भेट, आधुनिक शेती करीत असलेल्या भागातील भव्य प्रदर्शन, मल्टी मिडीया प्रसिध्दी, कृषी संबंधीत अनेक महत्वाच्या संस्थांचा सहभाग, वेगाने विकसित होणार्‍या अत्यंत महत्वाच्या अशा ग्रामीण बाजारपेठेत प्रवेश,नवीन उद्योगधंद्यांच्या प्रचंड उलाढाली, शेतकरी ग्राहकांना थेट भेटण्याची सुवर्णसंधी, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतकर्‍यांना करुन देण्याची सुसंधी थेट संवादाद्वारे शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्याची आणि त्यानुसार उत्पादनात बदल करण्याची संधी, महाराष्ट्रभर प्रदर्शनाच्या प्रसिध्दीचे प्रभावी नियोजन.व पिकांच्या वाढीसाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन ही कृषी महोत्सवाची वैशिष्टये आहेत.

 

तरी या कृषी प्रदर्शनास राज्यभरातील शेतकर्‍यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व विशेषत: सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ.अनिकेत भैया देशमुख युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!