sangola

सांगोला विद्यामंदिरमध्ये शिक्षक दिनानिमित्त सत्कार संपन्न

HTML img Tag Simply Easy Learning    

गुरुवर्य बापूसाहेबांच्या परिसस्पर्शातून विद्यामंदिरच्या संस्काराची रुजवण- मा.प्राचार्य आदलिंगे

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिरमध्ये झालेला सत्कार हा माझ्या माहेरचा सत्कार असून या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापकांपासून आजपर्यंतच्या सर्वांचा सहवास मला लाभला, शालेय जीवनातील गुरुवर्य बापूसाहेबांच्या परिस स्पर्शातून माझ्या आयुष्यात विद्यामंदिरच्या संस्कारांची रुजवण झाली व त्याचे बीजारोपण मी जगताना इतरत्र केले असे उद्गार माजी प्राचार्य हेमंतकुमार आदलिंगे यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे लायन्स क्लब सांगोला, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-सांगोला, नगर वाचन मंदिर, सांगोला, साने गुरुजी कथामाला शाखा-सांगोला व सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त आयोजित शहर व परिसरातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, लायन्स क्लब अध्यक्ष उन्मेश आटपाडीकर, प्राचार्य अमोल गायकवाड, माजी प्राचार्य भीमाशंकर पैलवान, अरविंद डोंबे गुरुजी, प्रा.राजेंद्र ठोंबरे सर यांच्यासह सत्कारमूर्ती उपस्थित होते.

यावेळी गंगाधर घोंगडे (माजी प्राचार्य-सांगोला विद्यामंदिर), लक्ष्मण विधाते (माजी उपमुख्याध्यापक-सांगोला विद्यामंदिर), पोपट केदार (माजी पर्यवेक्षक-सांगोला विद्यामंदिर), महादेव नरळे (सेवानिवृत्त क्रिडाशिक्षक-सांगोला विद्यामंदिर), नामदेव कोळेकर (माजी प्राचार्य-न्यू इंग्लिश स्कूल), भारत लवटे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक-जि.प.पुजारवाडी) या सेवानिवृत्त शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी माजी प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी सत्कारास उत्तर देताना कै.बापूसाहेब आणि कै.बाईसाहेब झपके यांच्या तत्त्वांसोबत जगताना आयुष्य सार्थकी लागले. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या सहवासात शैक्षणिक विश्वातील कामाची सुरुवात करताना विचारांची ठेवण उत्तम, उदात्त व उन्नत असावी याची जाणीव झाली असे सांगत यापुढे शिक्षकांनी पिढी घडवताना जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस परमपूज्य, प्रातःस्मरणीय कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सत्कारमूर्तींच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार समर्पण करण्यात आला.

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना नेहमीच पूजनीय व वंदनीय असणारा शिक्षकी पेशा असून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा प्रवास याच पेशातून शिक्षण आयोगाचे अध्यक्ष ते पहिले उपराष्ट्रपती व भारतीय राज्यघटनेतील सर्वात उच्च असणारे राष्ट्रपतीपदापर्यंत झाल्याचा उल्लेख केला. विषयज्ञानात अविरतपणे वृद्धी हे शिक्षकीपेशाच्या जिवंतपणाचे लक्षण असून डॉ.राधाकृष्णन यांना अभिप्रेत शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करताना विद्यार्थी फक्त यशस्वी परीक्षार्थी न बनवता उत्कृष्ट मूल्ये अंगी बाळगणारा भारतीय नागरिक घडवण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना करत मनापासून कर्तव्य बजावा, काळाचा विचार करून अध्यापन पद्धत वापरा असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ला.उन्मेश आटपाडीकर यांनी केले. सूत्रसंचालन ला.प्रा.शिवशंकर तटाळे यांनी तर आभार पर्यवेक्षक सुरेश मस्तुद यांनी मानले. याप्रसंगी उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

—————————————————————–
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके (बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार) आणि प्राचार्य अमोल गायकवाड (सूर्योदय उद्योग समूह ‘आदर्श शाळा’ पुरस्कार) व सौ.शुभांगी घोंगडे, प्रा.इसाक मुल्ला, यतिराज सुरवसे, सचिन बनकर यांना सूर्योदय उद्योग समूह ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदनपर सत्कार करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!