sangola

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव कार्यशाळा संपन्न

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला:येथील सांगोला नगरपरिषद सांगोला व राष्ट्रीय सेवा योजना ,फॅबटेक टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा ५.० अंतर्गत महाराष्ट्र शासन व पर्यावरण , वातावरण बदल विभाग यांच्या वतीने “पुनरावर्तन २०२४” हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विसर्जनानंतर शाडू मातीचा पुनर्वापर करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले . या कार्यशाळेसाठी नगरपरिषदेचे प्रतिनिधी श्री नवज्योत ठोकळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक  गणेशोत्सव या संकल्पनेची  माहिती व त्याचे फायदे सांगितले.

यावेळी डीन अँकँडमीक डॉ. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक  गणेशोत्सव साजरा करण्याचे तसेच त्याचा प्रसार करण्याचे आव्हान उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

हि कार्यशाळा फॅबटेक संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य डॉ रविंद्र शेंडगे, व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली . या कार्यक्रमासाठी प्रा. विनायक साळे , श्री. प्रशांत गोडसे, श्री.अझर तांबोळी  यांनी विशेष परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!