श्री.विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीचा दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात

सांगोला(प्रतिनिधी):- अल्पावधीतच ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्री.विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दि.29 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी चेअरमन दिपक बंदरे यांनी सर्वांचे स्वागत केले.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.साथ आमची प्रगती तुमची हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी श्री विठ्ठल मल्टिस्टेट ही हक्काची संस्था असेल असे आमचे व्हिजन असल्याचे चेअरमन दिपक बंदरे यांनी सांगितले आहे
श्री.विठ्ठल मल्टीस्टेट कडून ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिला यांना चालू व्याजदर पेक्षा 0.5 टक्के व्याजदर जादा राहणार आहे.त्याचप्रमाणे 36 महिन्याच्या पुढे 13 टक्के व्याजदर असणार आहे. वार्षिक ठेवींवर तब्बल 12 टक्के वार्षिक व्याजदर नागरिकांना मिळणार आहे.तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
यावेळी श्री.अनिल घोंगडे श्री.अमोल साळुंखे ,श्री.काशिनाथ ढोले श्री.रमेश लोखंडे श्री.राजू घोंगडे , श्री.इरफान खतीब श्री.अभय घोंगडे श्री.आप्पासाहेब दिघे, श्री.दिलीप मार्डे, श्री.दत्तात्रय घाडगे, श्री.महेश बनकर, श्री.समीर पाटील, श्री.धनाजी पाटील यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सभासद व हितचिंतक उपस्थित होते.