आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत सांगोला महाविद्यालयास उपविजेते पद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत सोनी कॉलेज, सोलापूर येथे
आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत सांगोला महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने दुसरा
क्रमांक मिळवला आहे.
सांगोला महाविद्यालय पुरुष संघाचा अंतिम सामना शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते
यांच्या बरोबर झाला त्यामध्ये मुलांच्या संघाने उपविजेते पद पटकावले. तर मुलींच्या संघाने देखील चांगला
खेळ दाखविला त्यांना चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. सर्व विजेत्या खेळाडूंचे संथेचे अध्यक्ष बाबुराव
गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, व प्रा.पी.सी. झपके, खजिनदार मा. श्री. नागेश गुळमिरे, सचिव
म.सी. झिरपे, सहसचिव साहेबराव ढेकळे व इतर संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.
सुरेश भोसले यांनी खेळाडूंचा सत्कार करून अभिनंदन केले.
खेळाडूंना प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण, व जिमखाना कमिटीचे सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. सत्कार कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक पी.एस.शिंदे, सर्व प्रशासकीय सेवक, महाविद्यालयातील
विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.