उत्तमदादा खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरामध्ये 379 लाभार्थ्यांनी घेतला लाभ 

सांगोला :-रतनचंद शहा बँकेचे संचालक, लोटेवाडी गावचे माजी आदर्श सरपंच उत्तमदादा खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आयोजित शिबिरामध्ये विविध प्रकारच्या आजारावरील एकूण 379 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. यानिमित्ताने ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत अथवा ऑपरेशन करावे लागणार आहे अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी अकलूज, सांगली, मिरज पुणे यासारख्या मोठ्या शहरात नामवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

   सदर शिबिराचे उदघाटन आम. शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक नेते डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर, यांच्यासह अकलूज येथील नामवंत डॉक्टर इनामदार, तज्ञ डॉक्टर तुषार गुळविले, डॉ. कोल्हे, डॉ. विजयसिंह भोसले, डॉक्टर प्रकाश लवटे, डॉक्टर ठेंगील, डॉक्टर सौरभ आजोळकर, डॉक्टर सागर कारंडे, डॉक्टर प्रकाश मेटकरी, डॉक्टर भारती खांडेकर यासह सौदागर सावंत, शिवसेनेचे युवा नेते दादासाहेब लवटे, राजेवाडी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब करनवर, विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य विविध राजकीय सामाजिक पक्षाचे पदाधिकारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

   महा आरोग्य शिबिरामध्ये 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून माजी सरपंच उत्तमदादा खांडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये एकूण आठ रुग्णांची तपासणी करून त्यांना डॉक्टर पटवर्धन हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. वयश्री योजनेअंतर्गत एकूण 214 नागरिकांचे मोफत फॉर्म भरून देण्यात आले त्याचबरोबर 450 कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.

   सांगोला तालुक्यासह जिल्ह्यातील नामवंत डॉक्टरांनी वेळात वेळ काढून रुग्णांची तपासणी करण्यात आली. या निमित्ताने महा आरोग्य शिबिरामध्ये लोटेवाडी गावासह सांगोला तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन विविध आजारावरती तपासणी करून उपचार घेण्यात आला. सदर शिबिर यशस्वी राबवण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे आभार देखील मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button