विजेचा शॉक लागून चिमुरड्याचा दुदैवी अंत
मेडशिंगी(वार्ताहर):-राहते घरात विजेचा शॉक लागून चिमुरड्याचा दुदैवी अंत झाल्याची घटना काल बुधवार दि.2 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास मेडशिंगी ता.सांगोला येथे घडली. श्लोक रणजित शिंदे (वय वर्षे 8) असे मृत्यू पावलेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंभूराजे साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली आहे. विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे मेडशिंगी सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.