सांगोला :- सांगोला तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या काही खेडेगावात पेट्रोल पंप ची सोय नाही. अशा खेड्यांमध्ये सध्या मोबाईल पेट्रोल पंप फिरतोय. तुम्हाला शेतीच्या कामासाठी डिझेल हवा आहे फक्त एक कॉल करायचा तुमच्या गावात डिझेल पोच होईल, अशी सुविधा काही पेट्रोल पंप चालकांनी सुरू केली आहे.
चोपडी येथील शेतकऱ्यांना,मोठ्या वाहनधारकांना पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी हातीद,नाझरे किंवा आटपाडी या ठिकाणी असणाऱ्या पेट्रोल पंपावर जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही खर्च होतो. ही शेतकऱ्यांची निकड लक्षात घेता ग्रामीण भागात छोट्या टँकरच्या माध्यमातून मोबाईल पेट्रोल ब्राउझर ही संकल्पना सुरू केली आहे.पेट्रोल पंप चालकांना फोन करायचा आणि आपल्या डिझेलची मागणी कळवायची अर्ध्या तासाच्या आत गावात डिझेलची गाडी येऊन जसे पंपावर ती डिझेल वाहनांमध्ये भरले जातेअगदी त्याच मशीन द्वारे पंपावरती असणाऱ्या किमती प्रमाणेच डिझेल वाहनांमध्ये भरले जाते. यामुळे मोठे वाहनधारक किंवा ट्रॅक्टर,जेसीबी व इतर शेतीसाठी लागणारे वाहन असतील या सर्वांना सदर संकल्पनेचा फायदा होत आहे. मोबाईल पेट्रोल ब्राउझर हे वाहन चोपडी, गौडवाडी, बुध्देहाळ, माडगुळे,सोमेवाडी अशा पेट्रोल पंपा पासून दूर असणाऱ्या खेड्यांमध्ये पोहोचत आहे. चोपडी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात ग्रामपंचायत सदस्य दिनकर बाबर, उल्हास बाबर,बंडु मेखले, सुरेश जाधव व इतर शेतकरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पंप चालकांनी केलेल्या या सुविधांमुळे वाहनधारक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. सांगोला तालुक्यातील ज्या खेड्यांमध्ये पेट्रोल पंप ची सोय नाही त्या खेड्यांच्या परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंप चालकांनी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली तर निश्चितपणाने शेतकऱ्यांना व शेती विषयक काम करणाऱ्या सर्व वाहनधारकांना फायदा होईल.
चौकट – गावात किंवा गावाच्या जवळपास पेट्रोल पंप उभा करायचा म्हटले तर खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो. विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणजे मोबाईल पेट्रोल ब्राउझर हा आहे.ज्या शेतकऱ्यांची शेती कामासाठी लागणारी वाहणं आहेत अशा शेतकऱ्यांना दररोज सकाळी वाहन घेऊन आठ-दहा किलोमीटर पेट्रोल पंपाकडे जावे लागत होते अशा सर्व वाहनधारक शेतकऱ्यांची सोय मोबाईल पेट्रोल ब्राउझरच्या माध्यमातून गावोगावी होत असल्याने शेतकऱ्यांनी या पेट्रोल पंप चालकाच्या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
….पोपट यादव ( उपसरपंच ग्रामपंचायत चोपडी)