६ डिसें.रोजी डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांच्या गझलवाचनाचा कार्यक्रम

सांगोले, मंगळवार दिनाक ६ डिसें. २०२२ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन आणि क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन असल्याने त्यानिमित्त ह्या दिवशी संध्या.६ वाजता सांगोला अर्बन बँकेच्या सभागृहात सांगोल्याचे सुपुत्र, आद्य मराठी गझलसंशोधक, ज्येष्ठ गझलकार डॉ.अविनाश सांगोलेकर (पुणे ) ह्यांचा ‘ अविनाशपासष्टी ‘ हा गझलवाचनाचा जाहीर कार्यक्रम होणार आहे. त्याचे आयोजन रोटरी क्लब ऑफ सांगोला आणि सांगोला अर्बन बँक ह्या दोन संस्थांनी केले असून त्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष रो.दत्तात्रय पांचाळ,सचिव रो विकास देशपांडे आणि सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी ह्या दोघांनी केले आहे.