जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत आ.शहाजीबापू पाटील यांचा दिव्यांग बांधवांसोबत मनमोकळा संवाद

सांगोला(प्रतिनिधी):-दिव्यांग असतानाही त्यांनी जे यश मिळविले ते पाहिले असता एक दिव्यांग स्वत:ची अर्थव्यवस्था असावी, म्हणून लवकरच एक दिव्यांग पतसंस्था सांगोला या नावाने पतसंस्था निर्माण करणार आहे. सांगोला विधानसभा मतदार संघातील येणार्या 3 ते 4 महिन्यात दिव्यांग बांधवांना सरकारची मदत मिळाली नाही असा एकही दिव्यांग बांधव राहणार नाही. दिव्यांग बांधवांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी मी कटीबध्द असून दिव्यांग बांधवांना सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ देणार असल्याचे आ.शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
काल शनिवार दि.3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांगोला येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात दिव्यांगाचा सन्मान सोहळा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी दिव्यांगाशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या.व्यासपीठावर अॅड.बंडू काशिद, तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, गुंडा खटकाळे, डॉ.पियुषदादा साळुंखे-पाटील, संजय पाटील, दत्तात्रय सावंत, दिग्विजयदादा पाटील, धनंजय काळे, सुभाष इंगोले, प्रा.संजय देशमुख सर, सौदागर केदार, सोमेश यावलकर, संजय मेटकरी, विजय मरगळ, श्रीनिवास करे, संजय काशिद, समीर पाटील, धीरज पवार उपस्थित होते. यावेळी आ.शहाजीबापू पाटील बोलत होते.
पुढे बोलताना अॅड.आ.शहाजीबापू पाटील म्हणाले, दिव्यांग बांधवांशी चर्चा करीत असताना काहींचे किस्से ऐकताच मन भरून आलं. एवढा संघर्ष ही मंडळी लढतात कसा ? हा प्रश्न मात्र मला सारखा पडत होता. समस्या आहे म्हणजे त्यावर उत्तर ही आहेच, मात्र ते शोधलं पाहिजे व जीवन जगले पाहिजे अशी बहुमोल शिकवण देणार्या या दिव्यांग बांधवांसाठी लाभदायी असं बरेच काही करू, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.
केंद्रसरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग बांधवांच्या योजना सांगोला तालुक्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी माझी असल्याचे सांगितले. पुढच्या आठवड्यापासून दिव्यांग बांधवांच्या अडअडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र टेबल देणार असल्याचे सांगत तुम्ही परमेश्वर रुपाने आज आलात, तुमची सेवा करायला मिळाली हे माझे भाग्य असल्याचेही सांगत दिव्यांग बांधवांचे आभार मानत दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बंधू-भगिनींच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी ’संवाद दिव्यांगांशी’ या कार्यक्रमाद्वारे तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधवांशी संवाद आ.शहाजीबापू पाटील यांनी साधला. विशेष म्हणजे आ.शहाजीबापू पाटील यांच्या विनंतीस मान देऊन मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव कार्यक्रमास हजर राहिले याप्रसंगी विविध क्षेत्रात सरस कामगिरी करणार्या दिव्यांगांचा सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ.शहाजीबापू पाटील यांनी मूकबधिर, दिव्यांग आणि मतिमंद बांधवांसोबत मनमोकळा संवाद साधला. यावेळी नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक अॅड.बंडू काशिद, सूत्रसंचालन व आभार अमोल यादव यांनी मानले.
चौकट:- अनेक शासकीय कार्यालयात व दवाखान्यात गेल्यानंतर वेगवेगळ्या अनुषंगाने दिव्यांग बांधवांना अडचणी व समस्या येतात. त्यावेळी कोणही अधिकारी असो, तहसीलदार, बीडी.ओ, ग्रामसेवक, तलाठी, शिपाई, कारकून असो दिव्यांग बांधवांना त्रास दिला की, मला कल्पना द्या. त्या अधिकार्याला सांगोल्यात ठेवणार नाही असे सांगत उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना स्वत:चे दोन मोबाईल नंबर देवून दिव्यांग बांधवांची मने जिंकली.