माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बदनाम केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवेदन

सांगोला(प्रतिनिधी):-माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना अपशब्द व अपमानीत शिवराळ भाषा वापरून बदनाम केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पोलीस निरीक्षक सांगोला यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भारताचे गृहमंत्री श्री अमित शहा हे एका सार्वजनिक कार्यक्रमात अपशब्द व बदनामकारक वक्तव्य केले आहे त्यामुळे पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत आणि उध्दव ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात किंतु व घृणा निर्माण झाली आहे. आणि अशा वक्तव्यामुळे देशातील, महाराष्ट्रातील शांततेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे आम्हास सर्वांची त्याच्याबद्दल असलेली आदर व श्रध्दा नाहीशी झालेली आहे.
आमच्या भावनेला व श्रध्देला दुखापत करणारे व शांततेस बाधा निर्माण करणारे गृहमंत्री श्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनावर तालुकाप्रमुख सुर्यकांत घाडगे, भारत मोरे, कमरुद्दीन खतीब, अरविंद पाटील, गोरख येजगर, गणेश कांबळे, रघुनाथ ऐवळे यांच्या स्वाक्षरी आहेत.