न्यू इंग्लिश स्कूल सांगोला आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

21 जून हा दिवस सर्वत्र “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधुन न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून योगशिक्षका कु.आकांक्षा कुलकर्णी लाभल्या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे होते.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करताना असे सांगितले की,दररोज योगा केल्यामुळे आपले आरोग्य व्यवस्थित राहते. सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेपासूनच योग करावे म्हणजे आपले आरोग्य व्यवस्थित राहील व अभ्यास करण्यासाठी आपल्या बुद्धीमत्तेमध्ये वाढ होईल.असे उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगताना म्हणाले.

या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या योगशिक्षिका आकांक्षा कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून योग करून घेत असताना प्रत्येक योगासना विषयी माहिती व महत्व स्पष्ट केले.

 

प्रारंभी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या योग शिक्षिका आकांक्षा कुलकर्णी यांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलचे पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button