शिक्षक दिनानिमित्त वाढे गाव ता. सांगोला येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी सांगोला तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष वसंतराव दिघे अध्यक्ष स्थानी होते. सुरुवातीस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सदर प्रसंगी सेवानिवृत्त प्राध्यापक विजयकुमार जाधव, एन डी पाटील, शिवाजी भोसले, सुभाष दिघे, भारत दिघे, आनंत माने, नागनाथ तोडकरी, अर्जुन दिघे, गुलाब मुलानी, आण्णासो लेंडवे इत्यादी शिक्षकांचा माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार यांच्या शुभहस्ते व प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त एसटी कर्मचारी बाबासो बनसोडे, सोसायटीचे मा चेअरमन धोंडीराम दिघे, उद्योगपती रमेश दिघे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सूत्रसंचालन व सत्काराचे आयोजन इंजिनिअर श्रीकांत दिघे यांनी केले तर आभार वसंतराव दिघे यांनी मानले