सावे माध्यमिक विद्यालयात जागतिक हात धुवा दिन साजरा.

सावे माध्यमिक विद्यालयात 15 ऑक्टोंबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा करण्यात आला त्यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हाताला साबण लावून आपले हात स्वच्छ केले व स्वच्छतेचे महत्व समजून घेतले.

 

याप्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर यांनी जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले तसेच सर्वांनी जेवणापूर्वी व शौचालयाला जाऊन आल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुऊन कापडाने पुसून कोरडे करावेत. स्वच्छतेमुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते व संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्यास मदत होते असं त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीकडून स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचे सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button