सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते गणपतराव देशमुख यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त बुधवारी 7 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये पहिली ते चौथी प्रथम क्रमांकासाठी 1001 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 701 रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी 501 रुपये, इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांकासाठी 1001 द्वितीय क्रमांकासाठी 701 व तृतीय क्रमांकासाठी 500 एक रुपये, इयत्ता आठवी ते दहावी प्रथम क्रमांक आसाठी 1001 द्वितीय क्रमांकासाठी 701 व तृतीय क्रमांकासाठी 501 रुपये ज्युनिअर कॉलेज विभागासाठी प्रथम क्रमांक 1001, 701, तृतीय 501, सीनियर कॉलेज गट प्रथम क्रमांक 101, द्वितीय 701, तृतीय 501 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
आठ ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वाजता रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ( फक्त सांगोला शहरातील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी) प्रथम 10 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 150, द्वितीय क्रमांक दहा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 120, तृतीय क्रमांक 10 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 100 व उत्तेजनार्थ 20 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 80 रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक आठ वाजता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पहिली ते चौथी विद्यार्थ्यांसाठी माझी वसुंधरा, आई खरंच काय असते?, आमचे आबासाहेब स्व.डॉ. गणपतराव देशमुख हे विषय तर इयत्ता पाचवी ते सातवी साठी स्वच्छतेतून समृद्धीकडे, गाव माझा मी गावाचा, माझे आवडते व्यक्तिमत्व स्व.डॉ. गणपतराव देशमुख. हे विषय आहेत तर इयत्ता आठवी ते दहावी साठी असा घडवूया महाराष्ट्र, मुकी होत चाललेली घरे, मा. डॉ.गणपतराव देशमुख यांचे कार्य, तर ज्युनियर गटासाठी रील्स:- स्वैराचाराला आमंत्रण देता येत का? शब्द माझे माझीया हातातील तलवार आहे, राजकारणातील दीपस्तंभ मा. डॉ.गणपतराव देशमुख, हे विषय आहेत, तर सीनियर कॉलेज गटासाठी भ्रष्ट झाले श्रेष्ठ आणि शेतकऱ्याला कष्ट, जगी सर्व सुखी असा कोण आहे?, विधानसभेचे विद्यापीठ डॉ.गणपतराव देशमुख. असे विषय असून पहिली ते चौथी प्रथम क्रमांक 500 द्वितीय क्रमांक 300 तृतीय क्रमांक 200 तर उत्तेजनार्थ 100 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका प्रत्येक शाळेवरती पोहोच केलेली आहे, त्यानुसार सर्व नियम व अटीचे पालन करावे व जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा. केशव माने, डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.सिकंदर मुलानी, उपप्राचार्य प्रा. संतोष जाधव, उपमुख्याध्यापक प्रा संजय शिंगाडे, पर्यवेक्षक श्री तानाजी सूर्यगंध सर, पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर, पर्यवेक्षक श्री तातोबा इमडे सर, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दिनेश शिंदे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मिलिंद पवार, सौ स्मिता इंगोले मॅडम व प्रा. डॉ.जगन्नाथ ठोंबरे, यांनी केले आहे.