जागतिक महिला दिनानिमित्त सांगोला लायन्स कडून महिला शिक्षिकांचा सन्मान

सांगोला (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथील सर्व शिक्षिकांचा लायन्स क्लब ऑफ सांगोला कडून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष कै.गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास महिला शिक्षिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर प्रांतपाल ३२३४ड १ सन २००९-१० मार्गदर्शक ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण सचिव उन्मेश आटपाडीकर खजिनदार ला.प्रा.नवनाथ बंडगर, उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांचे हस्ते सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षिकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्री ही सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक मूल्य जपणारी, परिवर्तनासाठी पोषक वातावरण निर्माण करणारी अद्भुत शक्ती आहे. तिच्या अभ्यासू वृत्तीमुळे, कर्तृत्वामुळे तिचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होत आहे. महिला दिन महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देतो. त्यांच्यातला आत्मविश्वास जागा करतो व त्यांच्यात आत्मबल रुजवतो. वर्ष २०२३ महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्रांनी तंत्रज्ञान व ऑनलाइन शिक्षणात जगभरात योगदान दिलेल्या महिलांचा यथोचित सन्मान करावा अशी संकल्पना सादर केली होती. याला प्रमाण मानून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आम्हा सर्व महिलांचा लायन्स क्लब ऑफ सांगोला कडून झालेला सन्मान पुढील कार्यासाठी प्रेरणा देणारा आहे.
सौ.शुभांगी घोंगडे, सहशिक्षिका,सांगोला विद्यामंदिर, सांगोला