सांगोला तालुकाशैक्षणिक

सूर्योदय अर्बन च्या वतीने तालुक्यातील विविध गुणवंत शिक्षकांचा सन्मान ;  नवनिर्वाचित संचालकांसह गुरुजनांची मोठी उपस्थिती

सांगोला तालुका व परिसरामध्ये वित्तीय क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सूर्योदय अर्बन या संस्थेच्या वतीने सांगोला तालुक्यातील विविध गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये प्रचंड बहुमताने निवडून आलेले सर्व नूतन संचालक मंडळ तसेच त्यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा असलेले सर्व शिक्षक नेते मंडळी यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. शिक्षक सोसायटीचे नूतन चेअरमन भागवत भाटेकर , व्हाईस चेअरमन सावित्रा कस्तुरे तसेच संचालक संजय काशीद पाटील, बाबासाहेब इंगोले ,हमजूभाई मुलानी, संतोष कांबळे, मुरलीधर गोडसे, विजयकुमार इंगवले, राहुल चंदनशिवे, नयना पाटील, सतीश सपताळ, बाळासाहेब बनसोडे या संचालकांचा सन्मान करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झालेल्या सांगोला तालुक्यातील उच्च विद्या विभूषित असलेल्या पीएचडी पदवीधारक गुणवंत शिक्षिका राजेश्वरी कोरे मॅडम , श्राविका प्रशाला सोलापूर येथे कार्यरत असलेले व नुकतीच पीएचडी ही उच्च पदवी प्राप्त केलेले मेडशिंगी गावचे सुपुत्र सोमनाथ राऊत सर तसेच राज्यसेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उतुंग यश संपादन केलेले सुधाकर लेंडवे  यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

सुरुवातीला सूर्योदय अर्बन चे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी प्रास्तविकामध्ये संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख सांगत व आपणासारख्या गुरुजनांनी घालून दिलेल्या आदर्शवरूनच आम्ही वाटचाल करत असल्याचे नमूद करत आपल्या हातून भविष्यात उत्तम कार्य सतत घडत राहो अशा सद्भावना व्यक्त केल्या.l यावेळी जगन्नाथ भगत यांनी बोलताना सर्व गुणवंत गुरुजनांच्या कार्याचा गौरव करत आपण समाजाला घालून दिलेल्या एकोप्याच्या मार्गावरूनच आम्ही वाटचाल करत असल्याचे सांगत सूर्योदय उद्योग समूहाच्या वतीने कार्यरत असलेल्या एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बन सह बावीस फर्म विषयी माहिती दिली. तसेच या समूहाने आजवर केलेल्या व करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल देखील माहिती सांगितली. यावेळी नूतन चेअरमन भागवत भाटेकर , संचालक बाबासाहेब इंगोले, संतोष कांबळे तसेच राजेश्वरी कोरे मॅडम , सुधाकर लेंडवे साहेब इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक डॉ. बंडोपंत लवटे , सुभाष दिघे गुरुजी तसेच सूर्योदय अर्बन चे कर्मचारी वृंद इत्यादी उपस्थित होते.

 

शिक्षक नेते सुहास कुलकर्णी यांनी आपल्या खास विनोदी शैलीत सूर्योदय परिवाराच्या कार्याचे कौतुक करत शिक्षक परिवार व सूर्योदय अर्बन यांचे असलेले सलोख्याचे नाते उलगडून दाखवले. शिक्षक नेते अमोगसिद्ध कोळी गुरुजी यांनीही सूर्योदय परिवाराच्या सत्काराने आम्ही भारावून गेलो असून आमची खूप मोठी जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!