वाढेगाव येथे डाळमिल युनिटचे उद्घाटन

सांगोला:-दिनांक ०५ जानेवारी २०२३ रोजी सांगोला तालुक्यातील मौजे मेडशिंगी येथिल माधुरी कैलास शिंदे यांचे प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया ऊद्योग योजनेअंतर्गत उभारणी केलेल्या दाळ मिल युनिट ऊद्योगाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. सदरील दाळमिल युनिटला बँक आॕफ इंडिया शाखा सांगोला यांनी अर्थसहाय्य केले आहे. यावेळी बोलताना तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वेगवेगळे प्रक्रिया ऊद्योग उभारण्याचे आवाहन केले.
सदरील योजनेअंतर्गत नविन प्रक्रिया ऊद्योग उभारणीसाठी किंवा कार्यरत असलेल्या युनिटमध्ये विस्तारिकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरणासाठी लाभ घेता येतो. सदरील योजना बँक कर्जाशी निगडित असुन ३५ % किंवा जास्तीत जास्त १० लक्ष रू पर्यंत आनुदान देय आहे. यामध्ये दुध प्रक्रिया , मसाला प्रक्रिया, चटणी, भाकरी,पापड ,शेवया ऊद्योग , तेलघाणा, दाळमिल व कडधान्य प्रक्रिया , बेदाना, बेकरी उत्पादने इत्यादी अन्न प्रक्रिया उभारणी करता येतिल. सदरील योजनेत व्ययक्तिक महिला किंवा पुरूष लाभार्थी , युवक , ऊद्योजक, शेतकरी गट , महिला बचत गट किंवा शेतकरी उत्पादक कंपण्या लाभ घेऊ शकतील. ईच्छुकांनी कृषि विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषि आधिकारी यांनी केले. यावेळी बँक आॕफ इंडिया सांगोला शाखेचे शाखाधिकारी सुर्यकांत धस , अरूण शेंडे,विजय इंगवले,प्राताप इंगवले,अमर गोडसे,प्रभाकर कसबे,तुकाराम शिंदे,किसन इंगवले,शिंदे गुरूजी,रामचंद्र इंगवले, विनोद कसबे , कैलास शिंदे , कृषि सहाय्यक मनोज जाधव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.