न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण सप्ताहाची समुदाय सहभाग दिवसाने सांगता

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला असून शिक्षण सप्ताहाची सांगता सप्ताहाचा सातवा दिवस समुदाय सहभाग दिवस या उपक्रमाने करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य प्रा.केशव माने,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम यांनी समुदाय सहभाग दिवसाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितली.यानंतर वैशाली घोडके मॅडम या दिवसाची उद्दिष्टे सांगताना म्हणाल्या की,सामुदायिक सहभागातून शाळांचे सक्षमीकरण करणे त्याचबरोबर लोकसमुदायाच्या माध्यमातून शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आलेले आहे.समाजातील विविध घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करणे काळाची गरज असून याद्वारे शाळेबरोबरच विद्यार्थ्यांच्या विकासात भर पडेल. यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थी तसेच प्रशासकीय अधिकारी,शिक्षक,पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी सामूहिक भोजनाचा आनंद घेतला.
सदरच्या उपक्रमासाठी प्रशालेतील सर्वच प्रशासकीय अधिकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



