न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
सांगोला शहरातील नामंकित न्यू इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून (एसएससी) 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सर्व यशवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सन्मान न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने सर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्था सचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,संस्था सदस्य प्रा.दिपकराव खटकाळे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर तसेच गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात प्रा.प्रकाश बाबर यांनी प्रशालेतील गुणवंतांच्या यशाचा आढावा घेतला.
न्यू इंग्लिश स्कूल ने दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखत प्रशालेत कुमार सागर गणपत फुले याने प्रशालेमध्ये प्रथम त्याचबरोबर टेक्निकल विषयात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक विभागून कुमारी अतिथी सिताराम चव्हाण व कुमार धनराज मारूती ढाळे तृतीय क्रमांक कुमारी मंजुषा बापूसाहेब केदार चतुर्थ क्रमांक विभागून अनिरूद्ध सिद्धेश्वर कुलकर्णी व शर्विल दत्तात्रय देशमुख पाचवा क्रमांक श्रेया सचिन केदार सहावा क्रमांक वैष्णवी संताजी मोरे सातवा क्रमांक समिक्षा दिलीप पाटील आठवा क्रमांक वृषाली विकास सपाटे यांचा सत्कार संपन्न झाला.
तसेच संस्कृत विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या पाच विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता पाचवी व आठवी मधील गणित प्राविण्य परिक्षेत यश मिळविलेल्या गुणवंतांचा तसेच ॲबॅकस स्पर्धेत राज्यस्तरीय यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार संपन्न झाला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे संस्था सचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर म्हणाले की, शिक्षणाबरोबरच आपल्या जीवनाचा अर्थ कळला पाहिजे ही चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकल्याची लक्षणे आहेत. तुम्ही सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या फार मोठी परंपरा असलेल्या संस्थेचे विद्यार्थी आहात ही भाग्याची गोष्ट आहे. यापुढील काळात उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना आईवडिल आणि गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. आपली प्रतिमा आपल्यालाच निर्माण करावी लागते.
यावेळी पालक प्रतिनिधी ॲड.मारूती ढाळे यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की मी ही याच प्रशालेचा विद्यार्थी होतो व आज माझ्या मुलाने पण इथेच शिक्षण घेत जे यश मिळवले आहे याचा मला प्रचंड आनंद असून याचे सर्व श्रेय न्यू इंग्लिश स्कूल मधील गुरुजनांना जाते.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वैशाली घोडके मॅडम यांनी केले तर आभार प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर यांनी मानले.