सोनंद व नराळे गावात दिपकआबांचे उत्साहात स्वागत ; आबांच्या गाव भेट दौऱ्याला न भूतो न भविष्यती प्रतिसाद
सर्वसामान्य नागरिकांना लागली आबांची आस ; जागेवरच अडचणी सुटत असल्याने दौरा ठरतोय खास..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा ग्रामीण भागात तुफान लोकप्रिय ठरत असून नराळे व सोनंद ता सांगोला गावातही दिपकआबांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी, शेकडो प्रश्नांचा जागेवरच निपटारा होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. रविवार दि ११ रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नराळे हबीसेवडी आणि सोनंद परिसरातील वाड्या वस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
यावेळी साहेबराव बाबर, सुधाकर लंबे, रणजीत वाघमोडे, बंडू गेजगे, श्रीकांत गेजगे, राहुल वाघमोडे, उद्धव मोरे, दिनकर लंबे, संदीप बाबर, प्रोजीत भोसले, सदाशिव भोसले, पिंटू भोसले, योगेश इंगोले, नरेंद्र गायकवाड, बाळासो यादव, मधुकर इंगवले, अतुल नलवडे, बाळू गळवे, महादेव खरात, रामा उतरे, राम बुवा खरात, पांडुरंग खरात, भारत म्हारनुर, दादासो म्हारनुर, अर्जुन खरात आदीसह प्रमुख कार्यकर्ते आणि नराळे हबीसेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नराळे आणि हबीसेवाडी परिसरात नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासमोर मांडल्या. नराळे गावभाग, वाघमोडे वस्ती, यादव वस्ती, घाडगेवस्ती, बाबर इंगोले वस्ती, उत्तरेवस्ती तसेच हबीसेवाडी परिसरातील नागरिकांच्या स्थानिक रस्ते, शेतीची वीज तसेच प्रशासकीय पातळीवर शिधा पत्रिका शासकीय कागदपत्रे बाबत जाणवणाऱ्या समस्या मांडल्या यावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाला फोनवरून सूचना देत नराळे व हबीसेवाडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले.
सोनंद गावात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. गाव परिसरात सवाद्य मिरवणूक आणि शेकडो महिलांनी औक्षण करून दिपकआबांचे स्वागत केले. यावेळी सोनंद गावचे माजी सरपंच महादेव पाटील, अनिल मोटे, विजय काशीद लोहगावचे सरपंच तात्यासो चव्हाण, संभाजी काशीद यांच्यासह सतीश काशीद, प्रवीण पाटील, अतुल पाटील, दिपक पाटील, राजू पाटील, पप्पू काशीद, धनसिंग चव्हाण, भाऊसाहेब मंडले, समाधान मंडले, साहेबराव काशीद, प्रशांत कोळसे, विनोद काशीद, आदिनाथ सरवदे, बाळासाहेब ढगे, भारत काशीद, सुनील काशीद, शहाजी काशीद, नवनाथ फडतरे, संजय काशीद गुरुजी, बबन काशीद, चंद्रकांत काशीद, किसन बोराडे, महादेव काशीद, प्रवीण यादव, तुकाराम यादव, तुकाराम काशीद, अण्णासाहेब काशीद, भीमराव काशीद, बाळासाहेब खंडागळे, नंदकुमार काशीद, आनंदा नायकुडे, कल्याणराव भोसले, तात्यासो चव्हाण, तानाजी आगलावे आणि सुरेश गवंड आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सोनंद बस स्टॉप परिसर, शिवाजी चौक, सय्यद बाबा मठ, संजय काशीद गुरुजी यांच्या वस्तीवर, लक्ष्मीवाडी, शिवाजीनगर, म्हसोबा देवस्थान परिसर, चंद्रकांत काशीद घर तथा काशीदवाडी, माजी सरपंच महादेव बापू पाटील यांचे घर तथा पाटील वस्ती, आम्रपाली बुद्धविहार, मारुती मंदिर गावठाण परिसर, चव्हाणमळा या परिसरात हजारो नागरिकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच जागेवरून या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
————————————————————-
१) वाडी वस्तीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा पहिलाच नेता
सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासात कोणत्याही पक्षाचा राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्यावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत. गाव खेड्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या अडचणी किंवा व्यथा काय आहेत..? हे जाणून घेण्यासाठी राजकीय इतिहासात प्रथमच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी प्रत्यक्ष वाडी वस्तीवर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या या दौऱ्याचे चांगलेच कौतुक होत आहे.