वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात वृक्षारोपण

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विठ्ठलपंत शिंदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
आपुलकी प्रतिष्ठानच्या पर्यावरण बचाव उपक्रमास, आव्हानास प्रतिसाद देत संस्थेचे सचिव व्ही बी शिंदे सर यांचा वाढदिवस प्रशालेत वृक्षारोपण करून उत्साहात साजरा करण्यात आला . वृक्षारोपणामुळे पुढील काळात तापमान संतुलित राहण्यास मदत होणार आहे,नवीन पिढीमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याची आवड व गोडी निर्माण व्हावी, याकरिता आपुलकी प्रतिष्ठानने झाडे लावा ,झाडे जगवा राबविलेला उपक्रम स्तुत असल्याचे गौरवउद्गार नीलकंठ शिंदे सर यांनी यावेळी व्यक्त केले.
वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून या पुढील काळात देखील समाज उपयोगी उपक्रम व वृक्षारोपण करणार असल्याचे संस्थेचे नूतन सचिव विठ्ठलपंत शिंदे सर यांनी सांगितले.यावेळी संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, दत्तात्रय पाटील, संतोष कुंभार, सुयोग बनसोडे सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.