गुरूवर्य बापूसाहेब झपके स्मृतीसमारोह राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सुविधा सर्वप्रथम प्रदान करणारे शिक्षणमहर्षि व सांगोला, नाझरा, कोळा विद्यामंदिर प्रशालेचे जनक कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके ४२ वा.स्मृतीसमारोह विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. अशी माहिती सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी दिली.
यामध्ये आज दि.८ सप्टेंबर २०२३ ते १० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुरूषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा साखळी पद्धत व बाद पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.असून महाराष्ट्रातील मुंबई,पुणे, संभाजीनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मिरज,वारणानगर,घुणकी, कडा अकलूज आदी शहरातून २४ संघाना अंमत्रित केले..
या स्पर्धचे उद्घाटन पी.एन.जी. ज्वेलर्स पुणे उपाध्यक्ष अमितजी वैद्य यांचे शुभहस्ते व प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली व महा. बास्केटबॉल असो.अध्यक्ष धनंजय वेलूकर, खजिनदार जयंत देशमुख यांचे उपस्थितीत आज सकाळी ठीक १०.०० वा.सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे संपन्न होणार आहे. तसेच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि.१० सप्टेंबर २३ रोजी सायं.५.००वा. क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मा- संजयजी बनसोडे यांचे शुभहस्ते व बसवराज पाटील नागराळकर उदगीर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्योगपती सिद्धार्थ झपके,विलास क्षीरसागर, सुहास होनराव,ज्ञानेश्वर तेली ,नागेश तेली,मंगेश म्हमाणे, रत्नाकर ठोंबरे यांची उपस्थिती आहे.
तसेच शनिवार दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.०० वा.समाधी दर्शन व ८.०० वा.सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे तैलचित्र पुष्पहार अर्पण व ४.०० वाजता कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह सांगता समारंभ प्रमुख पाहुणे यजुर्वेंद्र महाजन प्रसिद्ध वक्ते, संस्थापक दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव यांचे शुभहस्ते व प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या समारंभामध्ये कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण होणार आहे.
चौकट – कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या स्मृतीसमारोह निमित्त १२ सप्टेंबर २०२३ रोजी ५ वी ते ७ वी गट तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व १३ सप्टेंबर २०२३ रोजी ८ वी ते १० व ११ वी १२ गट जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार आहेत.त्या संदर्भात जिल्ह्यातील शाळांना निमंत्रण पत्रिका पोस्टाने पाठवली आहे- अधिक माहितीसाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या संस्थेच्या www.stspm.org या वेबसाईटला भेट द्यावी व जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा.