खंडोबा बहुउद्देशीय संस्था य. मंगेवाडी संचलित पायोनियर पब्लिक स्कूल सीबीएसई येथे २९ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. आपल्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत ४०० हून अधिक गोल करणाऱ्या या महान खेळाडूच्या स्मरणार्थ भारत सरकारने २०२२ पासून त्यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. ऐतिहासिक प्रत्येक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी पायोनियर पब्लिक स्कूल सीबीएसई नेहमी कार्यरत असते.
शाळेचे क्रीडा शिक्षक श्री सरवदे सर यांनी मेजर ध्यानचंद सिंह यांच्या फोटोचे पूजन करून मेजर ध्यानचंद सिंह यांच्या खेळातील कारकिर्दी बाबत मुलांना माहिती दिली. दैनंदिन जीवनातील खेळाचे महत्त्व मुलांना पटवून दिले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक माननीय श्री अनिल यलपले सर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री सतीश देवमारे सर यांचे मार्गदर्शन लाभले.