सांगोला: फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, मधील सिव्हील विभागांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारातील ज्ञान मिळण्यासाठी विविध ठिकाणी क्षेत्र भेट देण्यात येते , याचाच एक भाग म्हणूनच जलविद्युत निर्मिती प्रकल्प भाटगर, निवासी टाउनशिप आणि आर.एम,सी. प्लांट सातारा ,कमान पूल , कास पठार , रायगड किल्ला या ठिकाणी भेट देण्यात आली.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पुस्तकी ज्ञान आणि त्याचा वापर करून निर्मिती करण्यात आलेले विविध प्रकल्प याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी अशा प्रकारच्या क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले ,असल्याची सिव्हील विभागाचे विभाग प्रमुख प्रा.शिवानंद माळी यांनी सांगितले.
हि क्षेत्र भेट संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. अमोल मेटकरी,प्रा.विशाल भाकरे,प्रा. के. एम. दुधाळ आणि प्रा.सौ. सोनाली पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.