सांगोला /प्रतिनिधी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेतील सांगोला तालुक्यातील पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेनेकडे तरुणांचा कल वाढत असून तरुणांची फळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे .सांगोला तालुक्यातील चिंचोली गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या 30 युवा कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश करून आमदार शहाजीबापू पाटील यांना समर्थ साथ देऊ व येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असे आश्वासन यावेळी दिले . शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले व सतर्क राहून जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याविषयी आवाहन केले.
पक्षप्रवेशावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, शिवसेना नेते दादासाहेब वाघमोडे सर ,शिवसेना नेते आनंदकाका घोंगडे, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे , युवा सेना शहरप्रमुख समीर पाटील यांच्यासह आदी मान्यवर, शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील चिंचोली गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विकासाच्या मुद्द्यावरती एकत्रित येऊन आमदार शहाजीबापू पाटील यांना विधानसभा निवडणुकीत मोलाची साथ देण्यासाठी व आमदार करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला आहे. तरुण कार्यकर्त्यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा बापूंसाठी जमेची बाजू आहे.