सांगोला तालुक्याचे अकरा वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रिय आमदार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
नाझरा गावचे सरपंच मंदाकिनी सरगर यांचे सुपुत्र युवा नेते संजय सरगर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी सरगर, माजी उपसरपंच मधुकर आलदर व विधीज्ञ दत्तात्रय वाघमोडे,प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, सोमनाथ सपाटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली.
स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांनी 55 वर्षाच्या लोकप्रतिनिधीच्या कार्यकाळात विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आढावा सुनील जवंजाळ यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये रोहन पांढरे या विद्यार्थ्याने चतुर्थ क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील शिक्षक दीपक शिंदे यांनी ग्रंथालयास संविधानाची एक प्रत भेट दिली.