नाझरा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची केरळ दर्शन शैक्षणिक सहल संपन्न

नाझरा( वार्ताहर):- नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल यावर्षी केरळ दर्शन साठी रवाना झाली होती. 7 डिसेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान सदर केरळ दर्शन सहल रेल्वेने आयोजित केली होती.
या शैक्षणिक सहलीमध्ये बेंगलोर येथील सर विश्वेश्वरय्या म्युझियम,कर्नाटक विधानसभा, चिन्नास्वामी स्टेडियम, केरळमध्ये आद्रपल्ली धबधबा,दुबई डॉक यार्ड,क्रूज वरून समुद्र सफारी केरळमधील थंड हवेचे ठिकाण मुन्नार येथे रोज गार्डन,चहाचे मळे,कॅम्प फायर अशा विविध गोष्टींचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला त्यानंतर खेकडी येथे मार्शल आर्ट व कथकली या नृत्यांचा आनंद घेतला.वनौषधी बागेला भेट देऊन आयुर्वेदाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.मेट्रोचा प्रवास विद्यार्थ्यांनी अनुभवला.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीमध्ये प्राचार्य बिभीषण माने,सहल विभाग प्रमुख प्रा. नारायण पाटील, प्रा. महेश विभुते,दिलीप सरगर, दत्तात्रय जाधव अतुल बनसोडे,मंजुश्री ओतारी,सेवक सोनिया जाधव यांनी सहभाग नोंदवला होता.सोलापूर येथील मधुरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत सदर सहलीचे आयोजन करण्यात आले होते.अतिशय आनंदमय वातावरणात विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीचा आनंद लुटला.