राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईमध्ये 12 लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त
विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची आचारसंहिता कालावधीत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व हातभट्टी वाहतुक करणाऱ्या वाहनावर केलेल्या धडक कारवाईमध्ये 02 चारचाकी वाहनासह एकुण रूपये 12 लाख 77 हजार 300 रूपये चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी घोडा तांडा, भोजाप्पा तांडा व सोलापूर शहर परिसरात केलेल्या अवैध हातभटटी दारु, निर्मिती केंद्रावर व हातभटटी वाहतुक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईत 5 हजार 300 लीटर गुळमिश्रित रसायन 700 ली. हातभटटी दारू, 01 बोलेरो जीप व 01 ईर्टीका कारसह एकुण रूपये 12 लाख 77 हजार 300 चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत एकुण सहा गुन्हे नोंदवण्यात आले आहेत त्यामध्ये तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली असून तीन आरोपी फरार असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई निरीक्षक श्री. आर. एम. चवरे, श्री जे. एन. पाटील, श्री अे. व्ही. घाटगे, तसेच दुय्यम निरीक्षक, श्री आर एम कोलते, श्री धनाजी पोवार, श्री समाधान शेळके, श्री सुखदेव सिद, श्रीमती अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री मोहन जाधव, संजय चव्हाण, जवान सर्वश्री अनिल पांढरे, आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनगुंटी, इसमाईल गोडीकट, विनायक काळे, वाहनचालक रशीद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.
अवैध मदयविक्री अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून अवैध मदयाबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांनी सांगुन अवैध मदयाबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.