आ.शहाजीबापूंना मोठा धक्का; महुद येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

सांगोला :शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महुद येथील शिवसेना (शिंदे गट) गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्यामुळे महूद भागातून शहाजी बापूंना मोठा धक्का समजला जात आहे.
यावेळी आबासो बंडगर, ज्ञानेश्वर बंडगर, विजय बंडगर अमोल बंडगर ,राहुल बंडगर, लिंगदेव येडगे, मायाप्पा येडगे, दत्तात्रय येडगे, शंकर येडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्ष प्रवेश केला
यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन देवून सर्वांचे स्वागत केले.
शिवसेना शिंदे गटामधील मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तन-मन धनाने काम करून विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना महुद भागातून विक्रमी मताधिक्य देवून विजय करण्याचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.