महाराष्ट्र
इंजि. बाबासाहेब भोसले बिझनेस एक्सलन्स अवाॅर्डने सन्मानीत

सांगोला( प्रतिनिधी)- संपूर्ण भारतातील नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी या हेतूने भारत व जगातील उद्योग व्यवसायात अग्रगण्य मानले जाणारे दहा देश यांचा ‘बिझनेस लिडरशिप लीग ‘ असून, ही संस्था दरवर्षी विविध व्यवसाय क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्ती व संस्था यांना दरवर्षी विशेष बिझनेस एक्सलन्स अवाॅर्डने सन्मानीत करते.
सोनंद गावचे सुपुत्र व सद्या खारघर नवी मुंबई येथे स्थायिक होऊन बांधकाम क्षेत्रात भरीव, उत्कृष्ट कामगिरी करत असलेले भोसले बिल्डर्स व डेव्हलपर्सचे अध्यक्ष मा. इंजि. बाबासाहेब महादेव भोसले यांना बांधकाम क्षेत्रातील सर्वोच्च ‘बिझनेस एक्सलन्स अवाॅर्डने सन्मानीत करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार नुकताच व्हिएतनामचे भारतातील राजदूत यांचे हस्ते इंजि. भोसलेसाहेब यांना प्रदान करण्यात आला.
सोनंद गावचे शेतकरी कुटुंबातील सुपुत्र असणारे इंजि. भोसलेसाहेब यांना त्यांच्या मातोश्री स्व. सुशीला,वडील स्व. महादेव भोसले यांनी अतिशय कष्टातून,प्रसंगी कर्ज काढून सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण दिले. मुळातच बौद्धिकदृष्ट्या चुणचुणीत असणार्या इंजि. बाबासाहेब भोसले यांनी शिक्षण पूर्ण करुन मुंबई गाठली. काही दिवस सुरुवातीला फार कष्ट घेऊन,मुंबईतच राहून आपण आपली उपजीवीका करायची असे ठरवले. सुरुवातीला छोटी छोटी बांधकामाची कामे ठेकेदारी पद्धतीने घेऊन पूर्ण केली. कामाचा दर्जा व प्रामाणिकपणा याच्याशी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी पूर्ण मुंबईत भोसले-पाटेकर ग्रुप ही फर्म भागीदारीत चालू केली. आज त्याचे वटवृक्षात रुपांतर होऊन पनवेल, रायगड या सर्वच परिसरात भोसले बिल्डर्सचा एक ब्रॅन्ड निर्माण झाला आहे. या व्यवसायात त्यांचे धाकटे बंधू मा. आनंदराव भोसले यांचेही यामध्ये मोठे योगदान आहे.
सांगोला तालुक्याच्या या सुपुत्राने आपल्या गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी आदिराज शिक्षण प्रसारक मंडळ, खारघर- नवी मुंबई ही संस्था स्थापन करुन सोनंद नगरीत लक्ष्मीदेवी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर सन २०११ साली सुरु केले. इ. नर्सरी ते इ. १२ वी पर्यंत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था तीन मजली भव्य इमारतीत सर्व अत्याधुनिक सेवासहीत सुरु केली आहे. विद्यार्थी संख्या जवळपास ७०० इतकी असून शिक्षक स्टाफ व कर्मचारी ५० आहेत.हे शैक्षणिक संकुल स्वयंअर्थसहाय्यीत असून शासनाची कोणतीही मदत न घेता अल्प फीमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते.
इंजि. बाबासाहेब भोसले,बंधू आनंदराव भोसले, सौ.अनिता भोसले,सौ. रजनी भोसले या सर्वांचे अखंडीत कष्ट मेहनत या जोरावरच भोसले कुटुंबीयांना हा मानाचा सन्मान मिळाला आहे. सद्या मा.इंजि.बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्र बांधकाम व्यावसायिक महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या असोसिएशनचे खजिनदार आहेत.
सदर पुरस्कार मिळेल्याबद्दल भोसले परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.