शहीद जवान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

सांगोला :-शहीद जवान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सोमनाथ बनकर (सर) यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना सोनंद हायस्कूलचे सोमनाथ बनकर सर म्हणाले कि,भारतीय जनतेच्या हृदयात स्वराज्याची ज्योत प्रज्वलीत करणारे “बाळ गंगाधर टिळक “ही “लोकमान्य” म्हणून मान्यता पावलेले थोर स्वातंत्र्यसेनानी होते .”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” असे सांगत त्यांनी भारतीय जनतेला जागृत केले लोकसेवा आणि देशसेवा हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले तरुणांना राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिक्षण संस्था स्थापन केली.असल्याचे सांगितले.
यावेळी पांडुरंग कुंभार ,धनाजी शिर्के ,सिद्धेश्वर जाधव,सुयश बिनवडे,मनोज जाधव, अर्जुन लगड इत्यादी मान्यवर उपस्थित होते