सांगोला विद्यामंदिरला जिल्हा शिक्षण अधिकारी सुलभा वठारे यांची भेट

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे दि.१३ फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावी शास्त्र जीवशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेस पुणे विभागीय शिक्षण मंडळ, उच्च माध्यमिक प्रात्यक्षिक परीक्षा – भरारी पथक प्रमुख सुलभा वठारे मॅडम (जिल्हा शिक्षण अधिकारी – योजना विभाग) यांनी भेट दिली.
पुणे विभागीय शिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा दिनांक २ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचे सूचित केले आहे. या अनुषंगाने सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये विज्ञान व संलग्नित विषयाच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सुरू आहेत. याप्रसंगी सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजची सुसज्ज जीवशास्त्र प्रयोगशाळा,प्रयोगासाठी उपलब्ध साहित्य तसेच विषयाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी दिलेली योग्य उत्तरे पाहता प्रात्यक्षिक परीक्षेसंदर्भात आनंद व्यक्त केला.
तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला नूतन प्रशासकीय दालन,कार्यालय व ग्रंथालयास भेट दिली व गुणवत्तेबरोबर भौतिक प्रगतीसाठी समाधान व्यक्त केले. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, सेवानिवृत्त मुख्य लिपिक सुनील झपके, प्रात्यक्षिक बाह्यपरिक्षक प्रा.मिलिंद पवार,जीवशास्त्रविषय विभाग प्रमुख प्रा.दिलीप मस्के, जीवशास्त्र विषयाचे प्रा.सुहास काळेल,प्रा.आरती वेदपाठक,प्रा.भाग्यश्री कोठावळे, प्रयोगशाळा सहाय्यक विजय जावीर व विद्यार्थी उपस्थित होते.