नाझरे प्रतिनिधी:-बलवडी ता. सांगोला येथील आकाश शिवाजी राऊत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून, त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
आकाश राऊत यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे प्राथमिक शिक्षण तर बालवाडी हायस्कूल बलवडी येथे माध्यमिक तर उच्च माध्यमिक आटपाडी व पदवी शिक्षण पुणे येथे झाले आहे. सदर निवडीबद्दल बलवडी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे