महाराष्ट्र
सांगोला महाविद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

सांगोला ता.उ.शि.मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालायात शुक्रवार दि.06 डिसेंबर 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्था कार्यकारिणी सदस्य् मा.श्री. सुरेश फुले यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले उपस्थित होते. यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ. नवनाथ शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांचे कार्य अलौकीक होते व ते सर्व जगास परिचित असे महापुरूष होते.
या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अमोल पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बाबासो इंगोले व श्री. अमर केदार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.