सावे माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा.    

सावे माध्यमिक विद्यालयात दिनांक 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्वप्रथम विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री बर्गे सर यांनी प्रार्थना घेऊन योगासनाचे महत्त्व प्रास्ताविक मध्ये केले.

 

विद्यालयातील  क्रीडा शिक्षक श्री बर्गे सर यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले .त्यामध्ये मानेचे व्यायाम, विविध हालचाली ,योगा प्रकारामध्ये त्रिकोणासन, पादहस्तासन, सुप्त कपुटासन ,शीर्षासन, हलासन, भुजंगासन, शलभासन, दंडासन, वज्रासन, उष्टासन, वक्रासन ,पवन मुक्तासन, शवासन इत्यादी आसने घेण्यात आली .त्यानंतर प्राणायाम, भ्रामरी, भस्त्रीका , ध्यानमुद्रा इत्यादी आसने सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने केली. अशाप्रकारे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

सदर कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर ,योग व क्रीडा शि क्षक श्री बर्गे सर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button