सांगोला तालुकामहाराष्ट्र

राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब महिला अर्बन को-ऑप. सोसायटी लि. या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन व जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

सांगोला येथील राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या बँकेचा पाचवा वर्धापन दिन व मासाहेब जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनुराधा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली डोंगरगाव येथील इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी सानिका श्रीकांत बाबर हिने उंच उडी स्पर्धेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल संस्थेच्या वतीने तिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित सभासदांपैकी वैशाली सावंत यांनी संस्थेचे भरभरून कौतुक केले जिजाऊ विषयी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या चेअरमन सौ शोभा संजय देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर संस्थेचे व्यवस्थापक वैभव इंगोले यांनी संस्थेचा आढावा थोडक्यात सांगितला. त्यानंतर संस्थेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमामध्ये सभासदांपैकी चांगल्या ठेवी ठेवणाऱ्या सुषमा भिंगे, राणी जाधव, अर्चना कोळेकर, रंजना सोळगे या महिला सभासदांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चेअरमन शोभा देशमुख, व्हाईस चेअरमन संगीता टकले, गीतांजली मोहिते, शुभांगी माने, सुनीता बाबर, संचिता टापरे, संगीता मोटे, रंजना नलवडे, मनीषा सावंत यांच्यासह सर्व संचालिका, सभासद उपस्थित होत्या. या वर्धापन दिनास महिला सभासदांनी चांगला प्रतिसाद दिला. अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचिता टपरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!