महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब देशमुख यांची सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठी सुनामी….

 

सांगोला :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कटफळ येथील शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत कटफळ येथील सोसायटीचे माजी चेअरमन उत्तम बंडगर, माजी उपसरपंच बाबासो बंडगर, विजय बंडगर, बाळासो बंडगर, औदुंबर धांडोरे, समाधान खरात यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेने शिंदे गटातून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.

पक्ष नेतृत्वाच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराला कंटाळून शिवसेना ( शिंदे गट) पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शेकाप मध्ये प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटा च्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना कटफळ गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार शेकाप मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जो अनागोंदी कारभार सुरू आहे त्यामुळे जनता प्रस्थापितांना वैतागलेले असून त्यामुळे शेतकरी कामगार पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. शेतकरी कामगार पक्षाने गेल्या पाच वर्षाच्या काळात अनेक गोष्टींना वाचा फोडला आहे गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी आंदोलने ही केली आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदणीत विजय होणार असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button