सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गुणदर्शन बहारदार सादरीकरणाने केले आस्वादकांना मंत्रमुग्ध

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन २०२२- २३ काल शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी सत्रामध्ये विद्यार्थ्यांचा बहारदार विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये वैयक्तिक नृत्य, सामुदायिक नृत्य यांच्या परिपूर्ण सादरीकरणाने आस्वादकांना मंत्रमुग्ध केले.
सकाळी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.त्यानंतर फिशपॉंडस अर्थात शेलापागोटे या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना मनमुराद आनंद घेतला.शेला पागोट्याने हसता- हसता काहींचा आत्मगौरव झाला तर काहींना आत्मभानही आले.
सकाळी १०.०० वा.संस्धा सचिव म.शं.घोंगडे यांचे शुभहस्ते फनफेअर , डॉ.शैलेश डोंबे यांचे शुभहस्ते व संस्था सदस्य विजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शन, संस्था कार्यकारिणी सदस्या सौ.शीलाकाकी झपके यांचे शुभहस्ते व संस्था खजिनदार शंकरराव सावंत यांचे उपस्थितीत कला प्रदर्शन, इनरव्हील क्लब सांगोला अध्यक्षा सौ.उमा उंटवाले यांचे शुभहस्ते व संस्था कार्यकारिणी सदस्य दिगंबर जगताप यांचे उपस्थितीत रांगोळी प्रदर्शन उद्घाटन संपन्न झाले. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान,उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण, प्रशाला स्नेहसंमेलन प्रमुख नरेंद्र होनराव उपस्थित होते.
यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटक डॉ.शैलेश डोंबे म्हणाले वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध होतो व त्याचा फायदा पुढील शिक्षणासाठी होतो.संस्था कार्यकारिणी सदस्य ॲड विजयसिंह चव्हाण यांनी स्नेसंमेलनाचा उद्देश स्पष्ट करत समोर बसलेले हसरे चेहरे बघायचे असतील तर शाळेतच यावे लागेल.हे विद्यार्थी पाहून माझाही आनंद द्विगुणित झाला असे सांगत विद्यार्थ्यांना या विविध प्रदर्शनाचे महत्व पटवून दिले.
दुपार सत्र प्रशाला विविध गुणदर्शन उद्घाटन ज्युनिअर कॉलेज विद्यार्थी शिक्षक दिन प्राचार्या वैष्णवी ढोबळे , प्रशाला मुख्याध्यापक सानिका पाटील,ज्युनिअर कॉलेज जनरल सेक्रेटरी स्वाती हजारे, प्रशालेची जनरल सेक्रेटरी अस्मिता जाधव, ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी प्रतिनिधी सायली दिक्षीत, प्रशालेची विद्यार्थिनी प्रतिनिधी विदिशा इंगोले यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी परीक्षक अतिश बनसोडे,कु.मृणाल राऊत व प्रशांत मिसाळ उपस्थित होते.त्यानतर संपन्न झालेल्या विविध गुणदर्शनामध्ये वैयक्तिक नृत्य, रिमिक्स,रिमिक्स लावणी, तांडव नृत्य, धनगरी गीत या प्रकारातील बहारदार सादरीकरणाने अनेकांची मने जिंकली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रशाला विभाग प्रमुख प्रशांत रायचुरे, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.इसाक मुल्ला व या विभागातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले
या बहारदार कार्यक्रमाच्या आस्वादनासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके संस्था कार्यकारणी सदस्य सौ.शीलाकाकी झपके,विश्वेश झपके,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, उत्सव विभाग प्रमुख व विभागतील सर्व शिक्षक तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
आज शनिवार दि.२४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वा.वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रशालेचे माजी विद्यार्थी सुहेल अ. काझी, (भा. रा. से.)अपर आयुक्त,GST महासंचालनालय,पुणे क्षेत्रीय विभाग, पुणे. यांचे शुभहस्ते व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.